Posts

शेतीचे गणित करणे ..... भाग १

नमस्कार. मित्रहो, माझ्या नावामागे सीएमए लावलेले आहे ते म्हणजे कॉस्ट अॅण्ड मॅनेजमेंट अकौंटंट. यात दोन अकौंटंट आहेत. एक कॉस्ट अकौंटंट आणि दुसरा मॅनेजमेंट अकौंटंट. याचा अर्थ सीएमए हा एका बाजूला कॉस्टचा म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी लागणाऱ्या सर्व दृश्य अदृश्य खर्चाचा हिशेब करतो, आणि दुसऱ्या रूपात ती गोष्ट करण्यासाठी जी जी संसाधने वापरली जात आहेत त्याचा वापर सर्वोच्च समतोल राखून सर्वोत्तम केला जातो आहे की नाही, त्यात सुधारणेला कोठे वाव आहे, कशा प्रकारची सुधारणा करावी इत्यादी प्रकारचा विचार (म्हणजे हिशेब) करून तो व्यवस्थापनाच्या समोर विचारार्थ ठेवतो. मी या विषयाच्या अभ्यासाची सुरूवात १९७३ ला केली आणि ती चालूच आहे. आजही शिकणार आहे. आज आपण सगळे माझे गुरू आहात. कारण, मी शेतकरी नाही. मला तुमच्याकडून शेतीविषयी शिकण्याची संधी कोकण कृषी विद्यापिठाने या बीज महोत्सवात आपल्याशी संवाद साधायला बोलावून दिली या साठी मी त्यांचा ऋणी आहे. मी शेतकरी नसलो तरी माझा जन्म आणि बालपण दापोली तालुक्यातील कोळथरे या छोट्या गावचे आणि शालेय शिक्षण तिथेच झाले. त्यामुळे शेती या विषयात शिकण्यासाठी लागणारी पार्श्व

शेतीमालाचे कॉस्टींग

नमस्कार शेतकरी मित्रांनो ! 🙏🏼 आज, शेतकऱ्यांसाठी 'शेतमालाच्या व पिकांच्या कॉस्टींग' संबंधी माहिती सांगणारा उपक्रम चालू करायचे ठरवले. त्याचा शेतकऱ्यांना आपले निव्वळ आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी उपयोग होईल. आज केलेल्या या विचाराचा पाहिला भाग दि० ३० एप्रिल २०२० रोजी, म्हणजे, ग्रामगीता देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या १११ व्या जन्मदिनी, आपल्यासाठी सादर करीन. तेव्हा आपण भेटूया ३० तारखेला ☺️ तोवर स्वतःस जपा, सरकारी आदेशांचे - संदेशांचे पालन करा. आपण सर्व मिळून आपल्या भारत भू ला व संपूर्ण जगाला सध्याच्या महामारीच्या संकटातून यशस्वीरीत्या बाहेर पडण्यासाठी हातभार लाऊया. ॥ शुभं भवतु ॥